आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावनसंपदा, वनौषधी, वन्यजीव यासह विविध करमणुकीचे साधन व दोन तलाव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात नववर्षापासुन सफारी सुरु केली जात आहे. या सफारीचा आनंद पर्यटनासाठी घ्यावा, असे आवाहन बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.
बुलडाणा अर्बन परिवार व वन विभाग वन्यजीव यांच्या वतीने ज्ञानगंगा अभयारण्यात सफारीचा प्रारंभ आज १ जानेवारी रोजी बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे करण्यात आला. यावेळी राधेश्याम चांडक बोलत होते. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी वसंत साबळे, बुलडाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांची उपस्थिती होती. सफारीसाठी धावणाऱ्या वाहनांची पूजा उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष कांतीलाल छाजेड, संचालक गोपाल चिराणीया, विनोद केडिया यांची उपस्थिती होती.
यावेळी चांडक म्हणाले की, बुलडाणा अर्बनने साखर कारखाना, तिरुपतीला भाविकांची व्यवस्थेसाठी राहण्याची व जेवणाची सोय केली आहे. जे उपक्रम लोकांना हवे असतात ते राबवले जात आहेत. मात्र रस्ता निर्मिती करणारी बुलडाणा अर्बन ही एकमेव संस्था आहे. आता सफारीचा आनंदही बुलडाणेकरांनाच नव्हे तर बुलडाण्यात परगावावरुन येणार्या पर्यटकांना घेता यावा, म्हणून सफारीची व्यवस्था केली आहे.
शेगाव येथेही ही व्यवस्था करण्यासंदर्भात आपल्याला फोन आले परंतु, बुलडाण्यावरुन सफारी करण्याचा अनुभव आल्यानंतर शेगाव येथूनही व्यवस्था करण्याचा निर्णय घेऊ,असेही भाईजी म्हणाले. यावेळी सहायक वन परिक्षेत्र अधिकारी वसंत साबळे यांनीही ज्ञानगंगा अभयारण्य त्यातील विविधतेबद्दल माहिती देऊन जंगल सफारीचा आनंद घेत इको टुरिझम सुरु करण्याबाबत बुलडाणा अर्बनला आवाहनही केले व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र काळे यांनी केले.
जंगल सफारीतून मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घ्या
ज्ञानगंगा अभयारण्य हा तब्बल २५ हजार हेक्टर वर पसरलेला आहे. पैनगंगा, ज्ञानगंगा या नद्याही प्रवाहीत आहे. पैनगंगेच्या उगमाला तर अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. असे विविधतेने नटलेल्या जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्य असून आयुर्वेद वनस्पती, वन्यजीव, पक्षी, सरपटणारे प्राणी तसेच पलढग व माटरगाव धरणावर देखील आहे. या निसर्गरम्य परिसराची सफारीला वाव मिळावा या उद्देशाने बुलडाणा अर्बन परिवाराने आधीही सफारीसाठी पुढाकार घेतला होता. परिसरातील जंगलाचे संवर्धन व्हावे तसेच पशु-पक्ष्यांना अभय मिळावे हा सुध्दा विषय या मागील असून या सफारीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.