आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहकरजवळ भीषण अपघात:आयशरचे चाक गेले डोक्यावरून, वडीलांचा जागीच मृत्यू! गंभीर जखमी मुलीच्या डोळ्यांसमोर दुर्घटना

मेहकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलढाण्यातील मेहकर परिसरात दुचाकी - आयशरची भीषण धडक झाली. या अपघातात तेरा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीच्या डोळ्यांसमोरच तिच्या वडीलांच्या डोक्यावरुन आयशरचे चाक गेल्याने त्यांचा अपघातात करुण अंत झाला. ही घटना आज घडली.

प्राथमिक माहितीनुसार, गजानन पांडुरंग मस्के (वय 45, रा. ब्रह्मपुरी हिवरा आश्रम) असे मृताचे नाव आहे. तर भक्ति गजानन मस्के (वय 13) असे जखमी मुलीचे नाव आहे. मुलीसमोरच वडीलांचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

असा घडला अपघात

  • ब्रह्मपुरी तालुक्यातील हिवरा आश्रम येथील गजानन पांडुरंग मस्के आणि त्यांची मुलगी भक्ती गजानन म्हस्के हे मेहकर वरून हिवरा आश्रम येथे जात होते. त्यांची मोटारसायकल नांद्रा धांडे फाट्यानजीक आली. तेव्हा रस्त्याच्या कडेला उभ्या असणारा आयशर ट्रक अचानक समोर आला.
  • दुचाकी वेगात असल्याने गजानन म्हस्के यांची दुचाकी आयशर ट्रकवर आदळली. ही धडक झाल्यानंतर गजानन म्हस्के नेमके ट्रकच्या खाली आले. आयशर ट्रकचे मागचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर वडिलांच्या मागे बसलेली भक्ती रस्त्यावर फेकली गेली.

मुलीच्या छातीच्या फासळ्या, हात फ्रॅक्चर

भक्तीचा एक हात फ्रॅक्चर असून तिच्या छातीला जबर मार लागला आहे. तिच्या छातीच्या फासळ्या फ्रॅक्चर झाल्या आहेत. तिला छत्रपती संभाजी महाराज नगर येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. गजानन मस्के यांच्या पश्चात पत्नी ,भाऊ, दोन मुली व मुलगा असा आप्त परिवार आहे. सुस्वभावी असलेल्या गजानन मस्के यांचे हिवरा आश्रम येथे जनरल स्टोअर्स असून त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे हिवरा आश्रम ब्रह्मपुरी गावावर शोककळा पसरली आहे.