आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाणा:पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली गांधी चौकातील इमारत, सुदैवाने जीवितहानी टळली

नांदूरा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मूख्य बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या गांधी चौकातील मूख्य मार्गावरील नवगजे यांची कीराणादूकानसह तीन मजली इमारत शनिवारी सायंकाळी कोसळली. इमारत कोसळण्याआधी या इमारतीत राहणाऱ्या आशीष नवगजे याच्या परीवारास बाहेर काढण्यात आल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. माञ या इमारतीखाली कीराणादूकानचे पूर्ण साहीत्य व आशीष याचे घरातील साहीत्य दबल्याने मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे. 

गांधी चौकातील मूख्य रस्त्यावर नवगजे यांची तीन मजली इमारत आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर त्यांचे कीराणा दूकान असून वरील मजल्यांवर आशीष नवगजे हे आई,पत्नी व मूलीसह राहतात. दरम्यान सायंकाळी ही इमारत शीकस्त झाल्याचे तसेच ती कोसळण्याचे संकेत त्या भागात असलेल्या सामाजीक कार्यकर्त्यांना प्राप्त झाले. यावेळी तेथे असलेले शिवसेना शहर उपप्रमुख अनील जांगळे व त्यांच्या सहकार्यांनी आशीष नवगजे व परीवारास तातडीने बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच ही इमारत कोसळली. इमारत कोसळताच मोठा आवाज झाल्याने परीसरातील नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ठाणेदार अनिल पाटील, तहसीलदार राहूल तायडे आपल्या ताफ्यासह तेथे आले.

नांदूरा शहरात लाॅकडाऊन असल्याने दूपार नंतर मार्केट बंद होते. त्यामूळे त्यामूळे त्याभागात वर्दळ नव्हती.अन्यथा खूप मोठे नूकसान झाले असते .शहरात अनेक इमारती धोकादायक झालेल्या आहेत. पालीका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देवून या इमारती पाडण्या बाबत कार्यवाही करावी. अशी मागणी शाहरवासियांनी केली आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser