आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:निवडणूक विभागामुळे कळले बुलढाणा; होते भिलठाणा झाले बुलढाणा अन् आचरणात आले बुलडाणा

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचानक जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा, असे असलेले कमानी वरील नाव जिल्हाधिकारी कार्यालयच बुलढाणा कसे झाले. अचानक झालेल्या या बदलाची चर्चा सर्वत्र होऊ घातली असताना हे नाव गॅझेटमध्येच असल्याचा निर्वाळा जिल्हाधिकारी कार्यालयाने दिला. मात्र हे गॅझेटची शोधाशोध मुळातच २०१४ च्या निवडणुकीवेळी झाली होती. त्याला कारणही निवडणुका आयोगच असल्याचे आता समोर आले आहे. निवडणूक विभागाला स्पष्टताच हवी असल्याने हा शोध आठ वर्षाने फलकाचे स्वरुपात आता समोर आला आहे. तर आपले सरकारवरही कोणीतरी तक्रार केली. त्यामुळे हा बदल झाल्याचे बोलले जात आहे.

खरेतर भिलठाणा असलेले या शहराला बुलढाणा हे नाव इंग्रजांनी दिले होते. त्यानंतर गॅझेटमध्येही बुलढाणा हेच नाव लिहले गेले. हे गॅझेट जवळपास ९६५ पानाचे आहे. त्याच्या पहिल्याच पानावर बुलढाणा असे नाव आहे. हेच नाव पुढे चालू राहिले होते. जिल्ह्यातील बुलढाणा आगारातील प्रत्येक बसवर बुलढाणा असेच लिहिले जायचे. मग बुलढाणाचे बुलडाणा झाले कसे, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे. मात्र शब्दांच्या अपभ्रंशामुळे ते बुलडाणा असे लिहले गेले असावे, असा मतप्रवाह आता बनू लागला आहे. त्याला एक शासकीय कारणही समोर आले आहे. भंडारा येथील डाक काही वर्षाआधी बुलडाणा येथे यायची. कारण त्यावेळी इंगजीतील तो शब्द असला तरी मग बुलढाणा एेवजी बुलडाणा असे लिहिणे सुरु झाले. मध्यंतरी एका साहित्यिकानेही प्रशासनाचा ही चूक लक्षात आणून दिली होती, असेही म्हटले जात आहे.

घटनेचा किस्सा असा आहे
२०१४ मध्ये बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर हे होते. त्यावेळी खासदारकीची निवडणूक लागली होती. मात्र निवडणूक विभागाच्या दरबारी बुलढाणा अशी नोंद होती. त्यामुळे निवडणूक विभागाने कळवताच जिल्हाधिकारी यांच्यापुढे प्रश्न पडला. दरम्यान, त्यावेळी गॅझेटची शोधाशोध सुरु झाली. त्यात मग १९७६ सालचे गॅझेट मिळाले ज्यात बुलढाणा असा उल्लेख होता. त्यानुसार अजूनही निवडणुकीचे कामकाज बुलढाणा याच नावाने होते.

लवकरच इतर विभागांना पत्र
बुलडाणा असे आता सर्वच विभागात लिहिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वातंत्र्य दिनापूर्वीच बुलढाणा अशी दुरुस्ती करुन प्रत्येक पत्रिकेवर बुलढाणा असेच लिहले होते. पोस्टरही बुलढाणा असेच लिहिले होते. आता जिल्हाधिकारी कार्यालयाने दुरुस्ती केली असून इतर विभागांनाही लवकरच बुलढाणा लिहण्याचे पत्र पाठवु किंवा तोंडी आदेश देऊ, असे निवासी उप जिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...