आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बुलडाणा:डॉक्टरांनी लहान मुलाचा मृतदेह समजून बाहुलीचे केले पोस्टमार्टम, पोटातून स्पंज बाहेर आल्यावर समजली चूक

बुलडाणा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या घटनेनंतर लोक सोशल मीडियावर डॉक्टर आणि पोलिसांची खिल्ली उडवत आहेत

बुलडाणा जिल्ह्यातून आश्चर्यकारक प्रकरण समोर आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क एका बाहुलीचे नवजात बालकाचा मृतदेह समजून शवविच्छेदन केले. त्याच्या पोटातून स्पंज निघाल्यानंतर डॉक्टरांना त्यांची चूक लक्षात आली. आश्चर्यकारक बाब म्हणजे पोलिसांनी देखील याची नीट तपासणी केली नाही. 

पोलिसांनीही नीट तपासणी केली नाही

खामगाव तालुक्यातील बोराजवाला गावात नदीकिनाऱ्याच्या झुडपातून मुलासारखी दिसणारी एक बाहुली आढळली. स्थानिक ग्रामस्थांनी फोन करून पोलिसांना सांगितले की झुडपात 7-8 महिन्यांचा एक मुलगा पडलेला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बाहुलीचा पंचनामा केला. यानंतर त्याला पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

अशाप्रकारे डॉक्टरांना त्यांची चूक लक्षात आली

दोन डॉक्टरांनी जेव्हा शवविच्छेदनाच्या टेबलवर त्याचे पोट फाडले तेव्हा दोघांनाही धक्का बसला. त्यातून फेस येत असल्याचे पाहून डॉक्टरांना त्यांची चूक लक्षात आली. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बाहुलीवरील चिखल सुकला होता. 

या प्रकरणाचा तपास करणारे निरीक्षक एस.एल. चव्हाण यांनी सांगितले की, चिखलात मळलेली बाहुली कडक झाल्यामुळे एका मुलासारखी दिसत होती. यामुळे हा गैरसमज झाला. आता या भागात या प्रकरणाची बरीच चर्चा सुरू आहे. लोक सोशल मीडियावर डॉक्टर आणि पोलिसांची खिल्ली उडवत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...