आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलढाणा जिल्ह्यातील पेपर फुटीची चौकशी सुरू:अमरावती विभाग बोर्डाची माहिती; दोषींवर कारवाई करावी - विद्यार्थ्यांची मागणी

बुलढाणा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे उच्च विभागीय सचिव उल्हास गरुड म्हणाले की, आज बारावीचा गणिताचा पेपर अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे परीक्षेपूर्वी अर्धा तास आधी फुटला,अगदी पेपर सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधीच सोशल मीडिया वर व्हायरल झाला असल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात अमरावती विभाग महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या पेपर फुटीची गंभीर दखल घेण्यात आली असून सिंदखेड राजाचे गटशिक्षण अधिकारी व बुलढाणाचे शिक्षणाधिकारी हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी चौकशी सुरू केली आहे. तसेच अमरावती विभाग कार्यालयातील अधिकारी सुद्धा बुलढाणामध्ये रवाना झाले असून दोषीवर कारवाई होईल, अशी माहिती विभागीय सचिव उल्हास गरुड यांनी दिली तर परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये, यासाठी सहा भरारी पद्धत तैनात केले अशी माहिती देण्यात आली.

त्याबाबत विद्यार्थ्यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आम्ही अभ्यास करून परीक्षा देतो मात्र असा गैरप्रकार जर होत असेल तर तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली तर यावर काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, शिक्षण मंत्राचा वचक नाही असा आरोप त्यांनी केला.

संबंधित वृत्त वाचा

बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला:परीक्षेच्या अर्धा तासापूर्वीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल, विधानसभेत उमटले पडसाद

बुलढाण्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावी गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. हा पेपर सकाळी साडेदहापासून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. परीक्षेपूर्वीच अर्धा तास आधीच गणिताच्या पेपरचा हा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यान कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी काळजी घेतली जात आहे. मात्र असे असतानाही परीक्षादरम्यान गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. याआधी बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार समोर आला होता. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...