आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा:मलकापूर पोलिस स्टेशनला तक्रार न घेतल्याने किन्नरांचा पोलिस ठाण्यात ठिय्या, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तृतीयपंथीयांनी कपडे काढून पोलिस स्टेशनवर आपला ताबा घेतला.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील पंत नगरमधील रहिवासी मोगराबाई यांच्याकडे 7 मे रोजी रात्री दोन वाजेच्या दरम्यान चोरी झाली होती. यावेळी काही लोकांनी घरात घुसून घरातील लोकांना धाक दाखवत मारहाण केली. तसेच रोख रक्कम 50 हजार रुपये, बँक पासबुक, आधारकार्ड आणि दागिने असा पाच लाखापर्यंत ऐवज लुटून नेल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती.

यात काही संशयितांची नावे सांगितल्या नंतरही पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप करत फिर्यादी मोगराबाई यांनी ही बाब विदर्भातील अनेक तृतीयपंथीय समाजाच्या कानावर टाकली. त्यामुळे 17 मे रोजी नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव खान्देश आदी जिल्ह्यातील अनेक तृतीयपंथीयांनी मलकापूर गाठले. त्यानंतर मोगराबाईच्या तक्रारीनुसार तपास करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र मागणी करण्याची पद्धत जरा वेगळीच झाल्याने पोलीस स्टेशन मध्ये खळबळ उडाली.

तृतीयपंथीयांनी कपडे काढून पोलिस स्टेशनवर आपला ताबा घेतला. आरडाओरड करू लागले तर तृतीयपंथीयांनी पोलिस ठाण्यात जोरजोरात आकांत तांडव केला. काही तृतीयपंथीयांनी आपले कपडेही काढण्याचा प्रयत्न करताच पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. एक तास चाललेल्या या प्रकारात पोलिसांनी सर्वांची समजूत काढल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. दरम्यान या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

बातम्या आणखी आहेत...