आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्यातून संपवले आयुष्य:लग्न जुळत नसल्याने तरुणाची आत्महत्या, अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले; बुलढाण्यातील घटना

बुलढाणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आत्महत्या देखील वाढल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. लग्न जुळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यात ही घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (27) या तरुणाचे लग्न जुळत नव्हते. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह शेतात जळालेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस सूत्रांनी व्यक्त केला. महेंद्र नामदेव बेलसरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

या तरुणाने स्वतःचे सरण रचून अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने स्वतः च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतले. त्यामुळे शेतातील पऱ्हाटीच्या गंजीने देखील पेट घेतला. युवकाने सरण रचले नव्हते असे पोलिस पाटील गजानन पाटीलांनी सांगितले. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस अधीक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...