आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक:बाप लग्न करुन देईना, संतापाच्या भरात मुलाने रखरखत्या उन्हात डोक्यात मारली काठी; वडिलांचा तडफडून झाला मृत्यू

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाप लग्न करुन देत नसल्याने संतापाच्या भरात एका 40 वर्षीय मुलाने आपल्याच वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाने रखरखत्या उन्हात वडिलांच्या डोक्यात जोरात काठी मारली. यात वडिलांचा तडफडून झाला मृत्यू झाला. आपल्या मुलाकडून वडिलांच्या झालेल्या खूनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव याठिकाणी घडली आहे. जामोद पोलिसांनी मुलास घटनास्थळावरुन अटक केली आहे. आरोपी मुलगा हा आपल्या वडिलांसोबत एका वीटभट्टीवर काम करत होता. आणि याचठिकाणी त्याने डोक्यात काठी मारुन त्यांचा खून केला. सोबतच्या कामगारांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली.

वीटभट्टीत काम

मुलगा भानसिंग भैरड्या याचे वय सध्या 40 आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो वडील नानसिंग भैरड्या यांच्याकडे लग्न जमवण्याची मागणी करत होता. मात्र वडिल त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तो संतापाने धुमसत होता. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथून जवळ असलेल्या अडोळ फाट्यावर दोघे बाप-लेक वीटभट्टीत काम करत होते.

चर्चेचे रुपांतर वादात

दोघे बाप-लेक वीटभट्टीत काम करत असताना अचानक त्यावेळी लग्नाचा विषय निघाला. आणि चर्चेचे रुपांतर वादात झाले. 40 वय झाले तरी बाप आपले लग्न लावून देत नाही, असे म्हणत मुलाने जवळ पडलेली काठी उचलली आणि थेट वडिलांच्या डोक्यात मारली. उन्हाचा वाढलेला कडाका आणि डोक्यातून वाहणारे रक्त यामुळे बापाचा तडफडून मृत्यू झाला.