आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलढाण्यात बारावी गणिताचा पेपर फुटला:परीक्षेच्या अर्धा तासापूर्वीच पेपर सोशल मीडियावर व्हायरल, विधानसभेत उमटले पडसाद

बुलढाणा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये बारावी गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. हा पेपर सकाळी साडेदहापासून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. परीक्षेपूर्वीच अर्धा तास आधीच गणिताच्या पेपरचा हा फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. यादरम्यान कॉपीसारखे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून मोठी काळजी घेतली जात आहे. मात्र असे असतानाही परीक्षादरम्यान गोंधळाचे प्रकार समोर आले आहेत. याआधी बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये उत्तर छापण्याचा प्रकार समोर आला होता.

बोर्डाकडून दुजोरा नाही

आता बारावीचा गणिताचा पेपर कोणी फोडला? पेपर व्हायरल करण्यामागे कोणाचा हात आहे? यामागे कोणते रॅकेट सक्रिय आहे का? याचा तपास सध्या केला जात आहे. यानंतर विधानसभेत पेपर फुटीचे पडसाद उमटले आहेत. यावेळी अजित पवार यांनी सरकार काय करत आहे? सरकार झोपले का? असा सवाल उपस्थित केला. मात्र, बोर्डाकडून पेपर फुटीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

याआधी घडल्या अशा घटना

मात्र पेपरफुटीची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही. या पेपरफुटीनंतर आता बोर्ड याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पेपर फुटल्याने जिल्ह्यात मोळी खळबळ उडाली आहे. याआधी यवतमाळ येथे इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...