आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा:पैनगंगा नदीच्या पुरात दोघे वाहून गेले, एक झाडाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला; दुसऱ्याचा शोध सुरू

बुलडाणा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जवळपास 100 मीटर अंतरावर या दोघांची दुचाकी सापडली होती.

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळतेय. नद्या नाल्यांना पूर आला आहे. दररम्यान बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथील दोन जण पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची माहिती आहे.

27 तारखेला बेपत्ता झालेल्याचा शोध घेण्यासाठी बचाव पथक कामाला लागले. यावेळी जवळपास 100 मीटर अंतरावर या दोघांची दुचाकी सापडली होती. यानंतर आज सकाळी दोघांपैकी एक जणाने बाभळीच्या झाडाला धरल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत. तो रात्रभर थंडीत कुडकुडत झाडावर बसलेला होता. तर दुसऱ्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...