आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैल ठार:बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार

मोताळा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिबट्याच्या हल्ल्यात एक बैल ठार झाल्याची घटना तालुक्यातील अंत्री शिवारात आज १२ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील अंत्री येथील शेतकरी राजेंद्र उत्तमराव जवरे यांची गाव शिवारात शेती आहे. या शेतात त्यांनी जनावरांसाठी गोठा बांधला आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी या गोठ्यात अकरा जनावरे बांधली. त्यानंतर जनावरांना चारापाणी करून ते घरी निघून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका बिबट्याने गोठ्यात प्रवेश करून एका बैलावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला.

आज सकाळी शेतकरी जवरे हे जनावरांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेले असता हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच सरपंच सचिन महाजन व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती वनविभागाला दिली. या घटनेत शेतकरी राजेंद्र जवरे यांचे ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गावालगतच बिबट्याने बैलाचा फडशा पाडल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने संबंधीत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...