आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगरंगोटी:‘ईश्वर चिठ्ठी’ने निघाला मानाचा बैल ; वरवट बकाल येथे पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा

संग्रामपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा तालुक्यातील वरवट बकाल येथे पोळ्याचा मानाचा बैल २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता ईश्वर चिठ्ठीने काढण्यात आला.आज सकाळीच त्याच्या शिंगांची रंगरंगोटी करून अंगावर नवा साज चढवून नवा दोर नव्या झुला टाकण्यात आल्या होत्या. घरातील लहान थोर मंडळीसह गृह लक्ष्मीने नव्या वस्त्रानिशी पूजन करून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला. वटेश्वर महाराज मंदिराच्या गावातील नागरिक आपल्या बैलांना घेऊन आले. या ठिकाणी बैल मालकांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका प्लास्टिक बरणीत टाकण्यात आल्या.

त्यामध्ये मानाचा बैल कृष्णा देविदास ढगे यांचा निघाला असून बैलाला मारोती मंदिरा समोर आणले. सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व गावातील नागरिकांनी बैलाची पूजा करून ग्रामपंचायतीच्या वतीने चार हजार रुपयांची झुल बैल मालकास दिली. सतीश टाकळकर व शेख वकील यांनी बैल मालकाचा सत्कार केला. यावेळी सरपंच प्रतिभा इंगळे उपसरपंच नंदा रौदडे, पोलिस पाटील शुद्धोधन इंगळे, तंटामुक्ती अध्यक्ष, रामदास बावसकर, चेतन बकाल, नारायण सावतकार, नारायण ढगे, बाळासाहेब महाले, सूर्यभान राठोड, शेख महेमुद, समाधान डाबरे, श्याम डाबरे, संतोष इघोकार, अजय बकाल, विजय महाले, योगेश डाबरे, चक्रधर इंगळे, संतोष टाकळकार, माणिकराव पवार, समाधान दामधर, गोपाल इंगळे, नारायण भुसारी, दिगंबर बावस्कर, प्रल्हाद अस्वार, मोहन रौडले, संतोष टाकळकर, संतोष इघोकार, गोपाल इंगळे, विजय इंगळे, बकाल,कडू ससाणे, मनोज बकाल, ग्रा पं कर्मचारी प्रल्हाद धुर्डे, राजू टाकळकार, गणेश माकोडे विजय वानेरे, संदीप ढगे तामगावचे ठाणेदार उलेमाले उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...