आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडोजर:अतिक्रमित 13 दुकानांवर फिरवले बुलडोजर

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खामगाव नगर परिषद हद्दीतील केडीया टर्निंग रस्त्यावर अतिक्रमण करुन बांधलेल्या दुकानांवर शुक्रवारी बुलडोझर चालवण्यात आला. केडीया टर्निंग रोडवरील १३ अतिक्रमित दुकाने सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी लावून जमीनदोस्त केली.

या कारवाईने शहरातील अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सध्या टिळक पुतळा ते केडीया टर्निंग या रस्त्याचे काम सुरु आहे. या रोडच्या हद्दीत येणाऱ्या अतिक्रमित दुकानधारकांना बांधकाम विभागाने नोटीसा दिल्या होत्या. त्या विरोधात या भागातील अतिक्रमणधारक न्यायालयात गेले होते.

परंतु न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने शुक्रवारी सकाळी जेसीबी लावून पोलिस वसाहतीजवळील १३ अतिक्रमित दुकाने पाडून जमीनदोस्त केली. पोलिस संरक्षणात ही कारवाई करण्यात आली. अलीकडच्या काही वर्षात पहिल्यांदाच शहरात अशी अतिक्रमित दुकाने पाडण्याची धडक कारवाई केल्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे रेल्वेगेटनजीकच्या न्यायालयाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...