आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडी शर्यत:बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण संस्कृतीला चालना मिळणार: विजय तायडे

सिंदखेडराजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे राज्यात बैल जोडी शर्यतीला शासनाने परवानगी दिली आहे. या बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते विजय तायडे यांनी केले.

तालुक्यातील नशिराबाद येथे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त २९ मार्च रोजी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी हे होते.

तर राजे लखोजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष शाम मेहेत्रे, नगरसेवक गणेश झोरे, राजेंद्र आंभोरे, सरपंच लक्ष्मण राठोड, माजी सरपंच प्रकाश गाडेकर, संतोष बर्डे, सर्जेराव कठोरे, रणू चौधरी, विष्णू कठोरे नारायण मेहेत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मेहेत्रे व राहुल राठोड तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...