आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:शिक्षण विभागातील अनेक रिक्त पदांमुळे आदिवासी तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा

संग्रामपूर / शेख अनिस6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून आदिवासी बहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील शिक्षण विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. अद्यापही हे ग्रहण सोडण्यास एकाही अधिकाऱ्यांना यश आले नाही. तालुक्यात गट शिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांची तब्बल ९३ पदे रिक्त आहेत. यावरही कळस म्हणजे अनेक शिक्षक गलेलठ्ठ पगार घेवून शाळेत न येता घरीच बसून राहात आहेत. त्यामुळे तालुक्यात शिक्षणाचा बोजवारा उडाला असून आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले आहे.

आदिवासी बहुल म्हणून संग्रामपूर तालुक्याची ओळख आहे. बहुतांश गावात आदिवासींचे वास्तव्य आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाव, यासाठी तालुक्यात मराठी माध्यमाच्या ९१ व उर्दू माध्यमाच्या १२ अशा एकूण १०३ शाळा सुरू करण्यात आल्या आहे. या शाळेत हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात तब्बल ९३ पदे रिक्त आहेत.

त्यामध्ये उर्दू व मराठी माध्यमांचे मुख्याध्यापक व शिक्षकांची ८३, गटशिक्षणाधिकारी १, केंद्र प्रमुख ७, विस्तार अधिकारी २, असे एकूण ९३ पदे रिक्त आहेत. तालुक्यात मराठी ९१ शाळेवर ४०५ शिक्षकांची पदे मंजूर असून त्यापैकी ५३ पदे रिक्त आहेत. तसेच उर्दू शाळेवर ७९ पदे मंजूर असून ३० पदे रिक्त आहेत. यावरही कळस म्हणजे मागील नऊ महिन्यांपासून गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे त्यांचा एका केंद्र प्रमुखाकडे प्रभार देण्यात आला आहे. १० मंजूर केंद्र प्रमुख पदांपैकी ७ पदे रिक्त आहेत. तर ४ विस्तार अधिकारी पदे मंजूर असून त्यापैकी २ पदे रिक्त आहेत एवढेच नव्हे तर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेत वर्ग खोल्यांची वानवा आहे. त्यामुळे एकाच खोलीत तीन ते चार वर्ग भरावे लागत आहेत.

त्यामुळे शिक्षक कोणत्या वर्गाला काय शिकवतात, हे विद्यार्थ्यांला समजत नाही. आजच्या आधिनक युगातही शैक्षणिक अनास्था दिसून येत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या अशी मागणी होत आहे.

दर महिन्याला रिक्त पदांचा अहवाल सादर करण्यात येतो
तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांची ९३ पदे रिक्त आहेत. माझ्याकडे नोव्हेंबर २०२१ पासून गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार आहे. दर महिन्याला जिल्हा परिषद प्रशासनाला रिक्त पदांचा अहवाल सादर करण्यात येत आहे.
-वासुदेव ढगे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी

शैक्षणिक रिक्त पदे त्वरीतन भरल्यास आंदोलन
संग्रामपूर तालुका हा आदिवासी तालुका असून या तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांसह शिक्षकांची ९३ पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य करण्यासाठी शिक्षकाची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
-मोहन पाटील, सामाजिक कार्यकर्ते.

बातम्या आणखी आहेत...