आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:लुंबिनी नगरात घरफोडी; चोरट्यांनी सव्वा लाखाचा माल केला लंपास

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदरखेड परिसरातील लुंबिनी नगरातील घर फोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण सव्वा लाख रुपयांचा माल लंपास केला. ही घटना शुक्रवार, २ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी घर मालकाने शनिवारी शहर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.

तालुक्यातील दहिद बुद्रुक येथील रवींद्र कौतिकराव राऊत हे शहराला लागून असलेल्या सुंदरखेड लुंबिनी नगरात वास्तव्यास आहेत. दरम्यान, शुक्रवारी ते शेतातील कामे करण्यासाठी दहिदला गेले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते पुन्हा घरी आले. परंतु शेतीचे काम असल्यामुळे संध्याकाळी ते घराला कुलूप लावून पुन्हा दहिदला गेले. हिच संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीचे सुमारास त्यांचे घर फोडले. यावेळी चोरट्यांनी घरातील एका लाख रुपये किंमतीचे साेन्याचे दागिने व रोख पंचवीस हजार रुपये असा एकुण सव्वा लाख रुपयाचा माल लंपास केला. दरम्यान आज शनिवारी सकाळी राऊत हे घरी आले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे.

बातम्या आणखी आहेत...