आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:औरंगाबादहुन यवतमाळकडे जाणाऱ्या एसटी बसला ट्रकची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू, 29 प्रवासी जखमी

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बसमध्ये अपघाताच्या वेळी 25 प्रवाशी प्रवास करत होते.

बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपास मार्गावर भीषण अपघात झाला आहे. औरंगाबाद येथून यवतमाळकडे जाणाऱ्या एसटीला ट्रकने देऊळगाव राजा बायपास मार्गावर धडक दिली. ही घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 29 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींवर देऊळगाव राजा येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरु आहे. बसचा या अपघात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बसमध्ये अपघाताच्या वेळी अनेक प्रवाशी प्रवास करत होते.

असा घडला अपघात?
औरंगाबाद येथून यवतमाळ कडे जाणाऱ्या एसटीला (एमएच 20 बीएल 2566) बायपासवर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच 18 बीएच 1919) बसला जोरदार धडक दिली. हे ट्रक नागपुरवरून अहमदनगरकडे कोळसा घेऊन जात होते. दरम्यान, या अपघातात गयाबाई खंडारे (65 वर्ष, मेहकर) यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 27 प्रवाशी जखमी झाले आहे. जखमींवर जवळील उपचार केंद्रात उपचार सुरु आहेत. अपघातातील 9 गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना पुढील उपचारार्थ जालना व औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

अनेक प्रवाशी गंभीर जखमी
देऊळराजा बायपास मार्गावरील या अपघातात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, यामध्ये एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी लोकांना तातडीने जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहे. अपघाताचा आवाज येताच स्थानिक गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, स्थानिक गावकऱ्यांनी बचाव कार्य सुरु करत अनेक लोकांना बसमधून बाहेर काढले. दरम्यान, काही लोकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला दिली.

अपघातातील जखमींची यादी
सदरील घटनेची माहिती मिळताच विभाग नियंत्रक रायलवार यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, त्यांनी तेथील लोकांशी संवाद साधत तात्काळ मदत म्हणून मदत जाहीर केली. यावेळी चिखली आगार व्यवस्थापक वाकोडे, वाहतूक नियंत्रक दोने, परदेशी व इतर कर्मचाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मदत केली.

  • कोमल सोनवणे (वय 30, शिराळा )
  • दिगंबर दत्ता वाळे (वय 45, गारखेडा)
  • सुशीला पवार (वय 65 वर्ष़)
  • विकास शिर्साठ (वय 26, रिसोड)
  • श्याम सुरेश गोपने (वय 36, औरंगाबाद)
  • रजी मुन्नीवाले (31 वर्ष, कारंजा लाड)
  • मारोती धनाजी हरकळ (50 वर्ष, जालना)
  • संगीता मारुती हरकळ (40 वर्ष, परतुर)

3 दिवसांपूर्वीच घडला मोठा अपघात, 13 मजूर ठार
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीडजवळील तढेगावमध्ये तीन दिवसांपूर्वीच मोठा अपघात झाला होता. सिंदखेडराजा- मेहकर महामार्गावरील तढेगाव फाट्यावर हा भीषण अपघात घडला होता. या अपघातात समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या 13 मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून 3 लोक गंभीर जखमी झाले होते. मजुरांना घेऊन जाणारे ट्रक तढेगाव फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उटल्याने हा अपघात घडला होता.

बातम्या आणखी आहेत...