आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बुलढाण्यात बस नदीत कोसळून भीषण अपघात; एका महिलेचा मृत्यू तर 20 ते 25 जण जखमी

बुलढाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
समृद्धीवर देखील एकाच दिवशी तीन‎ अपघात - Divya Marathi
समृद्धीवर देखील एकाच दिवशी तीन‎ अपघात

बुलढाणा जिल्ह्यातून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 20 ते 25 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

चिखली तालुक्यातील पेठ परिसरात ही घटना घडली असून जखमींना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून तब्बल 15 फूट खोल नदीत कोसळली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एक खासगी ट्रॅव्हल्स शेगाववरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. बस चिखली रोडवरील पेठ जवळ आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस पैनगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. या घटनेमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पेठ येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्याला सुरुवात केली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

समृद्धीवर एकाच दिवशी तीन‎ अपघात; सात जण जखमी‎

दुसरबीड‎ मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर ‎अपघातांची मालिका सुरूच असून, ही मालिका ‎ ‎ थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान आज‎ दुसरबीड ते मेहकर मार्गावर सलग तीन‎ अपघातांच्या घटना घडल्या आहेत. या‎ अपघातात सात जण जखमी झाले असून ‎जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.‎ परंतु सुदैवाने या अपघातात कुठलीही‎ जीवितहानी झाली नाही. परंतु तिन्ही वाहनांचे ‎ अतोनात नुकसान झाले आहे.

अपघातातील‎ गंभीर व किरकोळ जखमींना मेहकर व बिबी‎ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.‎ एम एच 12 एचव्ही 0767 या क्रमांकाच्या कार‎ चालकाने आपले वाहन भरधाव व‎ निष्काळजीपणे चालवून समोरील ट्रकला धडक‎ दिली. ही घटना मंगळवारी सकाळी पावणे सहा‎ वाजेच्या सुमारास बिबीजवळील चॅनल क्रमांक‎ 310.3 च्या नागपूर कॉरिडॉरवर घडली. या‎ अपघातात मिलिंद लक्ष्मण शिंदे वय 45, माया‎ मिलिंद शिंदे वय 42, हे दाम्पत्य गंभीर जखमी‎ झाले आहे. तर मेघा मिलिंद शिंदे वय 25, वैभव‎ मिलिंद शिंदे वय 19 व भारत लक्ष्मण शिंदे वय 32‎ हे किरकोळ जखमी झालेत. सर्व जखमींना‎ रुग्णवाहिकेद्वारे बिबी ग्रामीण रुग्णालयात‎ उपचारार्थ दाखल केले. तर दुसऱ्या अपघातात‎ एमएच 40 सीडी 1048 या क्रमांकाचे कंटेनर‎ समोरील वाहनास धडकले.

या अपघातात‎ कंटेनरचे नुकसान झाले असून, समोरील वाहन‎ नागपूरकडे निघून गेले. कंटेनर चालक रवी नरेंद्र‎ यादव वय 32 रा. ढेमा, उत्तर प्रदेश यास कुठलीही‎ दुखापत झाली नाही. ही घटना फर्दापूर जवळ‎ सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास चॅनल‎ क्रमांक 294 वर नागपूर कॉरिडॉरवर घडली.‎ अपघातग्रस्त कंटेनर लोडेड असल्यामुळे‎ आयसी फर्दापूर येथील क्रेनद्वारे हटवणे शक्य‎ नसल्याने खासगी क्रेन बोलावून दोन्ही क्रेनच्या‎ साहाय्याने हे अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला‎ करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

तर‎ तिसरी अपघाताची घटना फर्दापूर जवळ चॅनल‎ क्रमांक 265.7 वर घडली. एमएच 25 एजे 3348‎ या क्रमांकाच्या पिकअप चालकाने समोरील‎ ट्रकला जबर धडक दिली. हा अपघात दुपारी‎ दीड वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात‎ रामेश्वर सुधाकर वय 35 रा. तुळजापूर व इतर‎ एक असे दोन जण जखमी झाले असून, त्यांना‎ पुढील उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण‎ रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.‎