आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीव्र झटक्याने मृत्यू:गरबा खेळत असताना व्यावसायिकाचा मृत्यू

जानेफळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरबा खेळत असताना येथील एका होटेल व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षक कॉलनी परिसरात मागील पंचवीस वर्षापासुन दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली. मंडळाचे सदस्य असलेले विशाल पडरीया हे सायंकाळी रात्री पावणे दहा वाजता गरबा खेळण्यासाठी आले.

गरबा खेळत असताना त्यांना अचानक चक्कर येवुन ते खाली कोसळले. या प्रकारामुळे उपस्थित शेकडो भाविकांना एकच धक्का बसला. तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. केशव अवचार यांनी त्यांना वाचण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अवघ्या ४७ व्या वर्षी विशाल पडरीया यांची प्राणज्योत विझल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ,आई असा आप्त परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...