आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची कामे:दोन शिक्षकी शाळेवरील बीएलओंचे आदेश रद्द करा ; तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर

बार्शीटाकळी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दोन शिक्षकी शाळेवरील बीएलओचे आदेश रद्द करावे या मागणीचे नविेदन अ. भा. उर्दू शिक्षक संघटनेने तहसीलदार गजानन हामंद यांना दिले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तहसीलदारांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे दोन शिक्षकी शाळेवर केलेले बीएलओचे सर्व आदेश रद्द करावे. कारण की दोन शिक्षकी शाळेवर वर्ग १ ते ५ असून एका शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा प्रभार असतो, दुसऱ्या शिक्षकाकडे तीन वर्गाची जबाबदारी असते. तालुक्यात हिच स्थिती आहे. मुख्याध्यापकांना दोन वर्ग सांभाळून शाळेचे कामे करावी लागतात. ऑनलाइन काम, सरलमध्ये शाळा, शिक्षकांची व विद्यार्थ्यांची माहिती भरणे, आधार अपडेट, पटसंख्या, प्रमोशन, शिष्यवृत्तीची कामांचे अहवाल दररोज सुरू राहतात. प्रशिक्षणे आणि बैठकांची कामे शिक्षकांना करावे लागतात.

केंद्र प्रमुखांकडून अहवाल येताच लिंकमध्ये माहिती भरावी लागते. हार्ड कॉपी तयार करणे, पीडीएफमध्ये मेल वर माहिती पाठवणे. गणवेश खरेदी, ऑडिट, लेखापरिक्षण, पटनोंदणी, प्रभात फेरी व्यवस्थापन समिती व परविहन समिती अहवाल लिंक भरणे, उपस्थिती अहवाल, आरोग्य तपासणी, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, पालक सभा, बँकेची कामे, पं. स. केंद्र शाळेत बैठका, सर्वेक्षण, कोविड लसीकरण, वार्षिक नियोजन चाचण्या आदी अशैक्षणिक कामे शिक्षकांना करावी लागतात. शिक्षकांना शाळा सोडून इतर वाॅर्डमध्ये घरोघरी जाऊन इलेक्शन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याचे कामे दिलेली आहेत. मेसेजद्वारेे केंद्रप्रमुख मार्फत शिक्षकांना दररोज अहवाल विचारले जातात. शिक्षकांवर ताण आणून कामे केली जातात. आपल्या कार्यालयाकडून इलेक्शकार्ड सोबत आधारकार्ड लिंक करण्यासाठी लेखी आदेश संदर्भानुसार दिलेला नाही. दोन शिक्षकी शाळेवरील शिक्षकांचे बीएलओ आदेश रद्द करावे.

यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे जिल्हाध्यक्ष अनिसोद्दीन कुतबोद्दीन, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शाहिद इक्बाल खान सरफराज खान, ज्येष्ठ शिक्षक फुजेल सलीम सर, यासीर आरफात सर, तालुका अध्यक्ष रियझोद्दीन सदरोद्दीन सर, इम्रान अली गुलाम अली, राहुल्लह खान, मो. फारूक सखाउल्लाह खान, शब्बीर अहेमद, अब्दुल रशीद, जमील जागिरदार, शामराव सिरसाट, नावेद अंजुम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...