आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांना निवेदन‎:बोगस कामगारांचे परवाने रद्द करा‎

चिखली‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली‎ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये‎ हमाल कामगार मतदाराची जी तात्पुरती‎ यादी तयार करण्यात आली आहे. त्यांनी‎ कधी बाजार समितीमध्ये व इतर‎ कोणत्याही ठिकाणी कोणत्याच अडत ‎ दुकानांमध्ये काम करीत नाही. अशा‎ बोगस हमाल कामगारांचे नावे तात्पुरती‎ बाजार समितीने लावली आहेत. त्यामुळे‎ या बोगस कामगाराचे परवाने रद्द करण्यात ‎यावे, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या‎ वतीने १८ नोव्हेंबर राेजी एका निवेदनाद्वारे ‎तहसीलदार यांच्याकडे केली आहे.‎ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने‎ कायदा धाब्यावर ठेवून अधिकाऱ्यांनी‎ मनमानी करून यादी प्रसिद्धी केली आहे.‎

हमाल कामगारांना परवाने देताना‎ डॉक्टरांचे सर्टिफिकेट, आधार कार्ड,‎ फोटो, शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञा‎ लेख, अडत दुकानदाराचे अनुभव‎ प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय हमाल‎ कामगारांचा परवाना देता येत नाही. असे‎ असतांना बाजार समितीच्या‎ अधिकाऱ्यांनी बोगस हमाल कामगारांची‎ यादी तयार केली. विशेष म्हणजे या‎ यादीतील बोगस हमाल कामगार हे‎ आतापर्यंत बाजार समितीत अर्ज घेऊन‎ सुद्धा गेले नाही.

त्यामुळे अशा बोगस‎ हमाल कामगारांचे परवाने त्वरित रद्द‎ करून जे खरे हमाल कामगार आहेत‎ त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट‎ करण्यात यावे तसेच बोगस हमाल कामगार व बाजार समिती अधिकाऱ्यांवर‎ गुन्हे दाखल करण्यात यावे. अन्यथा‎ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा‎ रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयकांत‎ गवई, जिल्हा महासचिव सलीम भाई,‎ कामगार जिल्हाध्यक्ष रहेमान भाई यांच्या‎ नेतृत्वात तालुका उपाध्यक्ष मोहम्मद‎ सोहेल, दीपक गवई, शहर उपाध्यक्ष‎ सतीश पवार, दीपक तायडे, संदीप गवई,‎ विश्वनाथ सपकाळ यांनी दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...