आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:सिंदखेडराजाच्या नामांतराचा प्रस्ताव‎ रद्द करा; नागरिकांनी दिले निवेदन‎

सिंदखेडराजा‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे नाव बदलून ते जिजाऊ नगर‎ करण्याबाबत मागील काळात‎ करण्यात आलेल्या मागणीनुसार‎ प्रशासनाने एक प्रस्ताव शासनाकडे‎ सादर केल्याची माहिती आहे.‎ स्थानिकांचा कोणताही विचार न घेता‎ प्रशासनाने केलेल्या या कार्यवाहीवर‎ नागरिकांनी एका निवेदनाद्वारे आक्षेप‎ नोंदवला आहे. नामांतराचा प्रस्ताव रद्द‎ करण्याची मागणी प्रशासनाला‎ दिलेल्या या निवेदनाद्वारे करण्यात‎ आली आहे.‎ तहसील कार्यालयाने डिसेंबर २०२२‎ मध्ये या संदर्भात दिलेल्या‎ अहवालाचा संदर्भ या निवेदनात‎ देण्यात आला आहे.

सिंदखेडराजा‎ शिवतीर्थाच्या नामावलीत अग्रस्थानी‎ असलेले महत्त्वाचे शहर असून,‎ श्रीमंत मल्हारराव होळकरांनीही या‎ शहराचा मराठ्यांची काशी असल्याचे‎ म्हटले होते. भारतात काशी क्षेत्राला‎ जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व‎ महाराष्ट्रात सिंदखेडराजाला आहे,‎ असे निवेदनात नमूद करण्यात आले‎ आहे. लखुजीराव जाधव आणि‎ त्यांच्या वंशजांनी त्यांच्या परगण्यातील‎ किनगाव, देऊळगाव, आडगाव,‎ मेहुणा या गावांना राजा हा शब्द‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ जोडला. त्यामुळे या गावांना‎ किनगावराजा, आडगावराजा,‎ देऊळगावराजा, मेहुणाराजा असे‎ संबोधले जाते. या संपूर्ण परगण्याचे‎ मुख्य केंद्र म्हणजे राजधानी‎ सिंदखेडराजा होते असेही या‎ निवेदनात म्हटले आहे.‎ राजमाता जिजाऊ यांच्या नावाला‎ विरोध असण्याचे कारण नाही.

परंतु,‎ या शहराला त्यांचे वडील राजे‎ लखुजीराव जाधव यांचा जाजवल्य‎ इतिहास आहे. नावात बदल करून‎ आपण या इतिहासालाच बगल देत‎ आहोत का, असा प्रश्न या निवेदनाद्वारे‎ करण्यात आला आहे. शहराचे आहे‎ तेच नाव कायम ठेवण्यासाठी शहर व‎ परिसरातील नागरिक आणि जाधव‎ वंशजांनी निर्णय घेतला आहे. यासाठी‎ नगर पालिकेने विशेष सभेत नाव न‎ बदलण्याचा ठराव पारित केला आहे,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असेही निवेदनात म्हटले आहे.‎ शासनाने शहराचे नाव बदलण्याचा‎ प्रस्ताव खारीज करावा अन्यथा तीव्र‎ आंदोलन करण्यात येईल, असा‎ इशाराही देण्यात आला आहे.‎

या निवेदनावर शेकडो नागरिकांच्या‎ स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देताना‎ शिवाजी राजेजाधव, अॅड. नाझेर‎ काझी, नगराध्यक्ष सतीश तायडे,‎ छगनराव मेहेत्रे , माजी नगराध्यक्ष‎ नंदाताई विष्णू मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष‎ सीताराम चौधरी, बबनराव म्हस्के,‎ विजयराव तायडे, संदीप मेहेत्रे,‎ पालिकेतील सर्व नगरसेवक, भाजप,‎ शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना,‎ शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस,‎ राष्ट्रवादी, विविध संस्था, संघटनांचे‎ पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक‎ कार्यकर्ते, व्यापारी, युवक उपस्थित‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...