आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रकला कारची धडक, 3 मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जण ठार

शेवगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पनवेलला वास्तव्यास असलेले आव्हाने (ता. शेवगाव) येथील रहिवासी लग्न समारंभाला गावी आले. मात्र परतीच्या प्रवासात बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास पुणे-अहमदनगर महामार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. चुकीच्या दिशेने समोरुन येणाऱ्या ट्रकला कारची जोरदार धडक झाली. मृतांमध्ये दोन चिमुकले आणि एका किशोरवीय मुलाचा तीन समावेश आहे.

या अपघातात संजय भाऊसाहेब म्हस्के (वय ५३), राम भाऊसाहेब म्हस्के (वय ४५), राम राजू म्हस्के (वय ७), हर्षदा राम म्हस्के (वय ४ वर्षे), विशाल संजय म्हस्के (वय १६ वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर साधना राम म्हस्के या अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या साई गणेश हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

संजय भाऊसाहेब म्हस्के हे आव्हाने बुद्रुक येथील रहिवासी होते. मात्र अठरा वर्षापासून ते पनवेल येथे मुलांची स्कूल बस चालवण्याचा व्यवसाय करत होते. त्यांचा लहान भाऊ राम म्हस्के हा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होता. रस्त्यावरून जात असताना रांजणगाव एमआयडीसीतील एलजी कंपनीसमोर हा भीषण अपघात झाला. या कारमधील सर्व प्रवासी पनवेलला जात होते.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.

आव्हाने बुद्रुक गावावर शोककळा, ग्रामस्थ हळहळले एकाच कुटुंबातील पाच जणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे आव्हाने बुद्रूक गावावर शोककळा पसरली. नुकतेच लग्न समारंभासाठी आलेले पाच जण परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या दु:खद वार्तेने ग्रामस्थही हळहळले. बुधवारी गाव बंद ठेवत या कुटुंबियांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुधवारी दुपारी उशिरा त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...