आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन संस्था:समर्थ कृषी महाविद्यालयात गाजर गवत निर्मूलन सप्ताह साजरा

देऊळगावराजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाजर गवता विषयी जनजागृती निर्माण व्हावी व गाजर गवताचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने येथील समर्थ कृषी महाविद्यालय परिसरात गाजर गवत निर्मूलन सप्ताहाचा समारोप सोमवार रोजी करण्यात आला. जबलपूर येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तण संशोधन संस्थेच्या निर्देशानुसार दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुद्धा कृषी विद्या विभागातर्फे समर्थ कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते २२ ऑगस्ट पर्यंत गाजर गवत निर्मूलन सप्ताह पाळण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी गाजर गवताचे निर्मूलन केले. तसेच समारोप कार्यक्रमानिमित्त एक भव्य रॅली द्वारे गाजर गवताच्या निर्मूलनाविषयी जनजागृती केली. वसतीगृहाच्या आणि महाविद्यालयीन परिसरात गाजर गवत निर्मूलन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. मोहजितसिंग राजपूत, प्रा. नारायण बोडखे, प्रा. विलास सातपुते, प्रा. अश्विनी जाधव, प्रा. शुभम काकड व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.गाजर गवत निर्मूलन सप्ताह यशस्वी करण्यासाठी कृषी विद्या विभागाचे प्रा. अरविंद देशमाने, प्रा. किरण ठाकरे, प्रा. शीतल ढाकणे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...