आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; 2 लाख 53 हजार रुपयांचा माल जप्त

मोताळा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील उबाळखेड ते कोऱ्हाळा बाजार रस्त्यावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले. ही कारवाई ९ जून रोजी सकाळी करण्यात आली आहे. या कारवाईत तीन हजाराची एक ब्रास रेती आणी दोन लाख पन्नास हजार रुपयांचे ट्रॅक्टर असा एकूण २ लाख ५३ हजार रुपयांचा माल वन विभागाने जप्त केला आहे.

उबाळखेड ते कोऱ्हाळा बाजार या शेतरस्त्याने वन विभागाच्या हद्दीतून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यास मिळाली. या आधारे वनरक्षक आर.बी. सिरसाट हे या मार्गावर गस्तीवर असताना त्यांना रोहिनखेड येथील मोहम्मद जाकीर हा वन परिक्षेत्रात ट्रॅक्टरने अवैधरीत्या वाळूची वाहतूक करताना आढळला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे, वनपाल सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक आर.बी. सिरसाट यांनी केली आहे. वन विभागाच्या हद्दीत कोणीही प्रवेश करू नये, अन्यथा कारवाईचा इशारा नेहा मुरकुटे यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...