आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून होळी साजरा‎

बुलडाणा‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानगंगा अभयारण्यात पक्ष्यांंच्या‎ पिण्याच्या पाण्याची सोय करून‎ वन्यजीव सोयरे या संस्थेने आज‎ दि.५ मार्च रोजी होळी सण साजरा‎ केला. होळी हा सण आगळ्या‎ वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो.‎ हिवाळा ऋतूचे उन्हाळ्यात रूपांतर‎ होत असते.‎ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी देखील‎ होळीनिमित्त येथील वन्यजीव सोयरे‎ यांनी रविवार, दि. ५ मार्च रोजी‎ ज्ञानगंगा अभयारण्यात जात सहा‎ ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार‎ करून पाणी मातीचे २५ पॉट लावले.‎ होळी या सणापासून ऋतूत बदल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ होऊन हिवाळा संपून उन्हाळ्याची‎ सुरुवात होते.

येत्या उन्हाळ्यात पशू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पक्षांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत‎ या उद्देशाने ही अनोख्या होळी‎ साजरी करण्यात आली. हा उपक्रम‎ २०१६ पासून वन्यजीव सोयरे‎ सातत्याने राबवत असून भविष्यात‎ देखील राबवणार आहे. वन्यजीव‎ सोयरे डॉ.रवि शिंदे, जिल्हा हिवताप‎ अधिकारी शिवराजसिंह चव्हाण‎ यांनी पाण्याच्या मातीच्या पॉट‎ मोहिमेला उपलब्ध करून दिले.‎ या मोहिमेत वन्यजीव सोयरे शाम‎ राजपूत, प्रशांत राऊत, श्रीकांत‎ पैठणे, कैलाश गणगे, प्रदीप वनारे‎ आणि वन्यजीव सोयरेंचे नितिन‎ श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले. तर‎ फॉरेस्ट गाइड श्रीधर अंभोरे,‎ कर्मचारी तेजराव राठोड, ताकतोडे‎ यांनी मोहिमेत सहभागी होत‎ सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...