आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसेच क्रांतीज्योती ब्रिगेडच्या वतीने २ फेब्रुवारीला उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी ६ वाजता श्री संत तुकाराम महाराज चौकापासून गाथा प्रदक्षिणा करण्यात आली. हा दिंडी सोहळा श्री संत सावता महाराज चौक, हनुमान नगर, एकडे लेआउट, नागलकर ले आउट, बस स्थानक, सोनज रोडमार्गे परत संत तुकाराम महाराज चौकात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथा प्रदक्षिणा व दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी साडे सात वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रतिमा पूजन व प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानदेवराव पांडव होते. या वेळी नेत्रचिकित्सक डॉ. शरद पाटील यांनी जगद्गुरुंच्या क्रांतिकारी विचारांना जनसामान्यात रुजवून ते विचार जागृत केले पाहिजे, असे सांगीतले. त्यानंतर मधुकर महाराज इंगळे यांनी तुकोबांच्या अध्यात्मिक जनजागृती निर्माण करणाऱ्या कार्याबद्दल प्रबोधन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष सातव यांनी केले, तर सूत्रसंचालन दीपक फाळके यांनी केले. युवा सचिव योगेश डांगे यांनी अाभार मानले. कार्यक्रमासाठी श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज व सर्व संत महात्मा जयंती उत्सव समिती, राष्ट्रीय ओबीसी महासंघ व क्रांतीज्योती ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. रात्री साडेआठ वाजता महाआरती करून महाप्रसादाचे वितरण केले. याप्रसंगी शहरासह व परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.