आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवतार दिन:चक्र‌धरस्वामींचा अष्टशताब्दी महोत्सव उत्साहात ; श्रीकृष्ण मंदिर येथे दर्शनासाठी गर्दी

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अष्टशताब्दी अवतार दिन महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील साधू, संत, महंत आणि भाविक यांनी मेहकर येथे महानुभाव पंथाच्या श्रीकृष्ण मंदिर येथे दर्शनासाठी गर्दी केली होती.

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतरणास ८०० वर्षे पूर्ण होत आहे. २६ फेब्रुवारी १२६७ साली चक्रधर स्वामी मेहकर येथे आले होते. त्यामुळे येथे त्यांचे मंदिर असून मोठया प्रमाणात भाविक दर्शनाला येतात. चक्रधर स्वामी जयंती निमित्त विविध वेशभुषा केलेल्या बालकांसह , पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळच्या सत्रात मूर्तीस स्नान घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळी ७ ते ८ या वेळेस सामुहिक पारायण व नामस्मरण करण्यात आले. ८ ते ९ च्या दरम्यान विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. १० ते ११ वाजता ऊटी व विडा अवसर करण्यात आला. दुपारी १२ वाजता महाआरती, प्रसादवंदन, पंचावतार उपहार आदी कार्यक्रम झाले.

बातम्या आणखी आहेत...