आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात पंधराशे पंचवीस स्वस्त धान्य दुकाने असून अंत्योदयांना योजनेचे रेशन कार्ड ६२ हजार ३९३ आहे या योजनेचे लाभार्थी दोन लाख ७० हजार ६२१ आहे तसेच प्राधान्य गटातील जिल्ह्यातील रेशन कार्ड तीन लाख ४२ हजार ९८९ असून त्यावरील लाभार्थी १४ लाख ५६ हजार २११ आहे. एपीएल शेतकरी लाभार्थी ८३ हजार ८७४ असून त्यांची लाभार्थी संख्या तीन लाख ४२ हजार २३१ इतकी आहे मागील सहा महिन्यांपासून शेतकरी लाभार्थ्यांचे धान्य शासनाकडून वितरण बंद करण्यात आलेले आहे. स्वस्त धान्य दुकानदारांच्या मार्जिनचा किंवा कमिशनचा प्रश्नही प्रलंबित आहे.
त्यामुळे मंगळवारपासून स्वस्त धान्य दुकानदार ई-पास मशीन बंद ठेवणार आहेत. १ जानेवारी २०२३ पासून केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सर्व रेशनकार्ड धारकांना मोफत धान्य देण्यात येत असून ही योजना सुरू करण्यापूर्वी दुकानदारांच्या मार्जिनचा किंवा कमिशनच्या प्रश्नाबाबत केंद्र किंवा राज्य सरकारने आजपर्यंत ही कोणतीच आपली भूमिका शासन निर्णयाद्वारे दर्शवली नाही. दुकानदारांना कमिशन कोण देणार, याबाबत संभ्रमावस्था कायम आहे. जानेवारी महिन्यातील वाटप करूनही दुकानदारांच्या कमिशन चा निर्णय अद्यापपावेतो शासनाकडून घेण्यात आलेला नाही. त्यामुळे केंद्रीय व राज्य संघटनेने ७, ८ व ९ फेब्रुवारी रोजी ई पास बंद ठेवण्याचे आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. त्यामुळे धान्य वितरीत होणार नाही. २२ मार्च रोजी दिल्ली येथे रामलीला मैदानावर पाच लाख २८ हजार परवानाधारक जमवून संसदेला घेराव करण्याचा कार्यक्रम करून प्रधानमंत्री यांना निवेदन सादर करणार आहे.
राज्यस्तरावरही मुंबई येथे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रश्नासाठी एक दिवसाचं आझाद मैदानावर धरणे आंदोलन व मोर्चाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्याची घोषणा ८ फेब्रुवारी रोजी औरंगाबाद येथील राज्यस्तरीय मेळाव्यात सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या बैठकीला सर्व जिल्हयाध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना निमंत्रणही देण्यात आले आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र मजनू हिल गार्डन जवळ हडको, औरंगाबाद येथे हा मेळावा होणार आहे.
मोफत धान्य वाटपाच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या संदर्भात राज्यातील व देशातील परवानाधारकांच्या कमिशनच्या संदर्भात कोणताही निर्णय अद्याप पावतो झालेला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज्य सरकारने चर्चा केलेली नाही आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्यांवर राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचे सकारात्मक उत्तर राज्य महासंघाला दिलेलं नाही. मोफत धान्य वाटपाच्या निर्णयामुळे राज्यातील दुकानदारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे.
दुकारदारांना बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातही मुंबई विधानसभेवर महासंघाकडून मोर्चाचे आयोजन करणे महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणे आदी बाबी मेळाव्यात होणार आहे. जिल्हाध्यक्ष राज्य संघटनेचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष यांनी या बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे. -राजेश अंबुसकर, जिल्हाध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.