आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची फसवणूक; युवकाविरुद्ध गुन्हा, न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुन्या कॉटन मार्केट शेजारी राहणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यातून त्या मुलीला गर्भधारणा होऊन मुलगी झाली. नंतर त्या युवकाने लग्न करण्यास नकार दिला.या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलीने शहर पो‌लिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या २९ वर्षीय तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. दरम्यान, आज आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

त्या अल्पवयीन मुलीने १ जून रोजी दिलेल्या तक्रारीनुसार शहरातील यशवंत नगर भागात राहणाऱ्या आकाश अशोक सातपुते वय २९ याने लग्नाचे आमिष दाखवून २ ऑक्टोबर २०१९ पासून ते २५ सप्टेंबर २०२० या दरम्यान शहरातील जुने कॉटन मार्केट, पंत नगर मधील बाजूच्या शेतात, गजानन टॉकीज मध्ये वेळोवेळी नेऊन अत्याचार केला. त्यातून गर्भधारणा होऊन २५ सप्टेंबर रोजी मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर आकाशने तो मी नव्हे ची भूमिका घेत लग्नास टाळाटाळ केली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आकाश अशोक सातपुते याच्या विरूद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल करून त्याला काल रात्रीच अटक करण्यात आली. दरम्यान, आज गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ जुन पर्यंत अशी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास शहर ठाणेदार विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक रतनसिंह बोराडे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...