आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोख पोलिस बंदोबस्त:श्रींना उत्साहात निरोप; खामगावात गणेश विसर्जन शांततेत

खामगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संसर्गाच्या दोन वर्षाच्या विघ्ना नंतर यावर्षी निर्बंध विना शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रींना निरोप देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील २८ सार्वजनिक गणेश मंडळे सहभागी झाली होती. गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मानाचा लाकडी गणपती निघाल्यानंतर सकाळी नऊ वाजता फरशी येथून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली.

या मिरवणुकीत आमदार अॅड. आकाश फुंडकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, वंचित बहुजन आघाडीचे नेते अशोक सोनोने यांच्यासह मान्यवरांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीच्या सुरूवातीला खामगावचा राजा मानाचा लाकडी गणेश त्यानंतर ईतर गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी विविध गणेश मंडळाच्या आखाड्यांनी मल्लखांब तसेच रोप मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, मुंबई पोलिस उपायुक्त तथा तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर, पोलिस निरीक्षक अरूण परदेशी यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...