आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राण्यांचे संवर्धन:चित्याचे 17 रोजी पुनरागमन ; वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांची माहिती

खामगाव14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्ता हा जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी आहे. जवळपास ५० वर्षांपूर्वी चित्ता भारतातून नामशेष झाला आहे. सध्या केंद्र सरकार चित्ता या प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नरत असून येत्या १७ सप्टेंबर रोजी चित्त्याचे देशात पुनरागमन होणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी दिली.

येथील अरजन खिमजी नॅशनल हायस्कूलमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने चित्ता वन्य प्राण्याच्या पुनर्वसनाबाबत आज १२ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रविणा शाह हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी एन. डी. खरात उपस्थित होते. पुढे बोलताना किशोर पडोळ म्हणाले की, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी चित्ता हा वन्य प्राणी महत्त्वाचा आहे. अन्न साखळीतील वन्य प्राण्यांमध्ये तो वरिष्ठ पातळीतील आहे. चित्ता नसल्याने पर्यावरणाचे संतुलन व्यवस्थित न राहता त्याचे दुष्परिणाम दिसून आले आहेत.

चित्ता भारतातून नामशेष झाल्यानंतर जवळपास पन्नास वर्षांनंतर केंद्र सरकार मध्य प्रदेशातील श्योपूर येथील कुनो पालपूर नॅशनल पार्कमध्ये चित्ते ठेवणार आहेत. या ठिकाणी चित्ते आल्याने लोक त्यांना पाहण्यासाठी येतील. यावेळी किशोर पडोळ यांनी विद्यार्थ्यांना चित्ता वन्यप्राणी याचे अधिवासात बाबत व उपयोगिता याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थी तसे जनसामान्यांमध्ये चित्ता प्राण्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...