आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:अब्दुल सत्तार यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा : डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या विषयी गलिच्छ आणि खालच्या भाषेत वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा तात्काळ राजीना घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे.अब्दुल सत्तार हे काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. खऱ्या अर्थाने आज त्यांचा निषेध करत असताना मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले पाहिजे, असे आ. डॉ. शिंगणे म्हणाले. सुप्रिया सुळे मागील अनेक वर्षांपासून खासदार आहेत. संसदेत उल्लेखनीय काम त्यांनी केले आहे. जनतेच्या, समाजाच्या विविध समस्या त्या संसदेत मांडत असतात. हे सगळं करत असताना एक स्त्री म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना या शासनाचा आणि या मंत्र्यांचा दृष्टिकोन कसा आहे हे सत्तारांच्या वक्तव्यातून दिसून येत असल्याची खंत माजी मंत्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...