आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा समता परिषदेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष दत्ता खरात यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी चिखली तालुक्यातील तीन गावांच्या सरपंचांनीही पक्षात प्रवेश घेतला.
शिवसेना नेते खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी दत्ता खरात यांनी समर्थकांसह पक्षप्रवेश केला. यासोबतच येवता गावचे सरपंच निवृत्ती मैंद, गोदरीचे सरपंच भरत जोगदंडे आणि पळसखेड दौलतचे नीरज गायकवाड यांनीही पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास सरपंच गोपीनाथ लहाने, शहरप्रमुख विलास घोलप, रामकृष्ण अंभोरे, गोपाल ढेंग, निवृत्ती जाधव, सागर बानकर, त्र्यंबक सुरडकर, पद्माकर वानखेडे, प्रदीप चव्हाण, उद्धवराव काळे, विकास लहाने आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.