आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:देखावा सादरीकरणाला चिखलीकरांचा प्रतिसाद ; समितीकडून श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी

चिखली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी शहरात गणेशोत्सव धूमधडाक्यात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठानची सन २०२२ ची प्रोत्साहन समिती गणेशोत्सवाच्या औचित्यावर गठीत करण्यात आली होती. सांस्कृतिक विश्वातील मानबिंदु ठरलेल्या छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठानच्या प्रोत्साहन समितीला चिखलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर परिसरातील गणेश मंडळांनी देखाव्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. या मंडळांच्या श्री मूर्तींवर प्रोत्साहन समितीच्या वतीने गुलाब वृष्टी करण्यात आली. गणेश मिरवणूकी दरम्यान ढोलताशे, डी.जे., बँड आदी पारंपारीक वाद्यवृंदांनी चिखली नगरी दुमदुमली होती.

माजी आमदार राहुल बोंद्रे हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या व त्यांच्या कल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासुन दरवर्षी गणेश उत्सव कार्यकाळात शहरातील गणेश मंडळाकडून सादरीकरण करण्यात येणाऱ्या विविध धार्मीक, सांस्कृतीक, सामाजिक उपक्रमांसह विसर्जन मिरवणुकीतील देखावे इत्यादींचे निरीक्षण प्रोत्साहन समिती मार्फत करण्यात येते. प्रोत्साहन समितीच्या वतीने उत्कृष्ठ मूर्ती पुरस्कार, प्रथम ५ हजार रूपये, द्वितीय ३ हजार, तृतीय २ हजार रूपये, तसेच उत्कृष्ट देखावा पुरस्कार प्रथम ११ हजार, द्वितीय ५ हजार, तृतीय ३ हजार याचबरोबर शाळा पुरस्कार अंतर्गत वर्ग ५ ते ७ पर्यंत व वर्ग ८ ते १० पर्यंत अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रूपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

गणेशोत्सव सन २०२२ करीता गठीत करण्यात आलेल्या प्रोत्साहन समितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेशसेठ बाहेती, पत्रकार प्रकाश मेहेत्रे, नितीन गुंजाळकर, उद्धव पाटील, संतोष लोखंडे, गोपाल तुपकर, डॉ.सुहास खेडेकर, डॉ. शिवशंकर खेडेकर, डॉ.अजाबराव वसु, अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे, गणेशकर, तेजराव डहाके, किरण पवार, स्वप्नील तायडे, सुनील मोडेकर, विनोद नागवाणी, अ‍ॅड.सलीम शेख यांची परीक्षक म्हणून उपस्थिती होती.व्यासपीठावर राहुल बोंद्रे, डॉ. ज्योती खेडेकर, अतहरोद्यीन काझी, कुणाल बोंद्रे, श्रीराम झोरे, रवींद्र तोडकर, डॉ. मोहंमद इसरार, रफिक सेठ, राजू रज्जाक, प्रदीप पचेरवाल, किशोर कदम, सुरेंद्र ठाकूर, कपिल बोंद्रे, पप्पू जागृत, कैलास खराडे, हेमंतसेठ शिसोदिया, प्रदीप हाके, जाकीर भाई, अकिल यांच्यासह महाविकास आघाडी पक्षातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...