आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:अल्पवयीन मुलावर अत्याचार; आरोपीस वीस वर्षांची शिक्षा

मेहकर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. डोणगाव पोलिस ठाण्याअंतर्गत ३ सप्टेंबर २०२० रोजी अल्पवयीन मुलासोबत तुषार चव्हाण नामक व्यक्तीने अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी तुषार चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती.

तपासाअंती हे प्रकरण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ट करण्यात आले. या प्रकरणात सात साक्षी नोंदवण्यात आल्या. घटनेच्या वेळी पीडित बालकाचे वय चौदा वर्षे होते. आरोपीने अल्पवयीन मुलासोबत जबरीने अनैसर्गिक कृत्य केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने भारतीय दंड विधान कलम ३७७ व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ४ नुसार अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश एस. एम. चांदगुडे यांनी आरोपी तुषार चव्हाण यास वीस वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ५०६ नुसार एक वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने ॲड. जे. एम. बोदडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...