आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तर दुसरीकडे आजही ग्रामीण भागातील शाळेत शिक्षक व खोल्यांची वाणवा आहे. यावरही कळस म्हणजे येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चक्क घाण पाण्याच्या डबक्यातून वाढ काढीत शाळा गाठावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही या डबक्याची विल्हेवाट लावली नसल्याने पालकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.
जवळपास दोन अडीच हजार लोकसंख्या असलेल्या सावखेड नागरे येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी पर्यत शाळा आहे. या शाळेत गावासह शिवणी देशमुख व शिवणी आरमाळ येथील शेकडो चिमुकले विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. काही वर्षापूर्वी गावाच्या अर्ध्या किलोमीटरवर बसस्थानक झाल्यामुळे गावातील बरेच नागरीक बसस्थानक परिसरात राहावयास गेले आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून बसस्थानक परिसरातील शाळेच्या रस्त्यावर भले मोठे घाण पाण्याचे डबके साचले आहे. शाळेत जाण्यासाठी दुसरा कुठलाच पर्यायी रस्ता नसल्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना या डबक्यातूनच वाढ काढीत शाळा गाठावी लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या डबक्याची विल्हेवाट लावली नसल्यामुळे विद्यार्थ्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्याचे आरोग्य अबाधीत ठेवण्यासाठी या डबक्यातील पाण्याचा निचरा करण्यात यावा, अशी मागणी पालक करत आहेत.
रस्त्यावर मुरूम टाकून डबके बुजवण्यात येईल
घाण पाण्याच्या डबक्याबाबत सरपंच पती संजय मोरे यांना विचारणा केली असता त्यांनी घरपट्टी व नळपट्टी भरल्याशिवाय गावाला रस्ता व्यवस्थित मिळणार नाही. ग्रामपंचायतीला महसूल प्राप्त होताच मुरूम टाकून हे डबके बुजवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.