आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:चित्रा वाघ सोमवारी सिंदखेडराजात

सिंदखेडराजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा झाल्यानंतर चित्राताई वाघ हया ७ नोव्हेंबर रोजी सिंदखेड राजा येथे येत असून त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळावर जाऊन दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. यावेळी त्या महिला मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी केले आहे. चित्राताई वाघ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्या सिंदखेड राजा येथे ७ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जिजाऊ जन्मस्थळ राजवाडा येथे येऊन राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दहा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित महिला मेळाव्याला त्या मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून भाजपचे पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच चित्रा वाघ ह्या सिंदखेड राजा येथे आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची भव्य दिव्य तयारी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन विनोद वाघ यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...