आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध अभ्यासक्रमाबाबत परीक्षण:नॅक मूल्यांकनात चौधरी समाजकार्य महाविद्यालयास मिळाला बी प्लस ग्रेड

मलकापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसेवा मंडळ नरवेलद्वारा संचालित दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे नॅक बंगळुरू या संस्थेकडून मूल्यांकन करण्यात आले असून, महाविद्यालयाला बी प्लस ग्रेड मिळाला आहे.मागील २२ व २३ ऑगस्ट रोजी नॅक मूल्यांकन समितीने भेट देऊन महाविद्यालयाचे विविध अभ्यासक्रम, उपक्रम व स्थितीबाबत परीक्षण व मूल्यांकन केले. या मूल्यांकन समितीच्या पीअर टीममध्ये चेअरमन म्हणून डॉ. भारती हरीशंकर, कुलगुरू महिला विद्यापीठ कोइंबतूर तमिळनाडू, डॉ. संगीता माने समन्वयक समाजकार्य विभाग प्रमुख कर्नाटक विद्यापीठ, डॉ. अनिलकुमार अग्निहोत्री प्राचार्य शिक्षण महाविद्यालय नांदगड पंजाब यांनी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन केले. मूल्यांकनात महाविद्यालय इमारत, परिसर, महाविद्यालयात विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी उपलब्ध सुविधा, विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे उपकम, शिकवला जाणारा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग, महाविद्यालयातून पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मिळालेला रोजगार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक, विविध सामाजिक संस्थाचे कार्य इत्यादीचे मूल्यांकन करण्यात आले. महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत संस्थाध्यक्ष प्रा. डॉ. रमाकांत कोलते, सचिव प्रशांत खर्चे, प्राचार्य राजेंद्र दीक्षित, नॅक समन्वयक प्रा. अनिल सावळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...