आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रधानमंत्री आवास योजना:घरकुलांसाठी नागरिकांचा उपोषण करण्याचा इशारा ; गटविकास अधिकारी यांना निवेदन

संग्रामपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील एकलारा ग्रामपंचायतच्या वतीने प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर करण्यात आलेले असून देखील त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी १४ ऑगस्ट पर्यंत लाभ न दिल्यास उपोषणाचा इशारा गटविकास अधिकारी पं.स. तसेच एकलारा ग्रामपंचायतला दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

एकलारा ग्रामपंचायतला प्रपत्र ड चे घरकुल योजनेचे पंचायत समितीकडून यादी मंजूर होऊन ग्रामसभेमध्ये वाचन देखील करण्यात आले आहे. यादी वाचनाला दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटून केला आहे. तरी देखील ग्रा.पं.च्या लाभार्थ्यांना वतीने एकाही घरकुल लाभार्थ्याला उद्दिष्टाची पूर्तता करण्यात आलेली नाही. येथील ड यादीतील लाभार्थी ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे अद्याप पर्यंत वंचित राहिले. त्यामुळे एकलारा येथील घरकुल लाभार्थी व नागरिक यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन ड यादीतील वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांची घरकुल यादी मंजूर करण्यात यावी, अन्यथा ग्रामपंचायतने याची दखल न घेतल्यास १४ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनावर सुनील आस्वार, बळीराम धुळे, अमोल भातखडे, विवेक राऊत, गजानन वानखडे, सुरेंद्र धुरुडे, जनार्दन धर्मे, किसना तायडे, अरुण कोकाटे, श्रीकृष्ण पवार, हेमंत पवार, सुरेश हागे, नामदेव मिसाळ यांच्यासह गावातील नागरिकांच्या स्वाक्षरींचे निवेदन दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...