आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन सणासुदीच्या दिवसात होतोय शहरातील वीज पुरवठा ठप्प:जिल्ह्यात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त; महावितरणच्या कारभाराबाबत संताप

बुलडाणा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सणासुदीचे दिवस असून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत होत्या. त्यातच प्रचंड प्रमाणात उकाडा सहन करावा लागला त्याबद्दल वीज वितरण कंपनीबाबत नागरिकांची नाराजी उमटली होती.बुलडाणा शहरात गेल्या दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत होत आहे. कोणत्या ना कोणत्या भागात केव्हाही हा पुरवठा खंडीत होत असल्याने महिलांची सणासुदीची हातची कामे रेंगाळत आहे.

बुलडाण्यासोबतच आज खामगाव शहरातील चांदे कॉलनी भागातील विद्युत पुरवठा दुपार पासून ठप्प पडला होता.खामगाव शहरातीलच सिव्हील लाईन परिसरातील विद्युत पुरवठा बंद होता. ऐन गणेश मूर्ती स्थापना करण्याची तयारी सुरु आहे. दुसरीकडे महिला गौरीची आगमनाच्या तयारीत लागल्या आहेत. असे असताना विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने घरातील कामांवर परिणाम होत आहे. काही भागात तर विद्युत पुरवठा होता परंतु, तो कमी दाबाचा असल्याने अनेकांना घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य उडून जाण्याची भीती वाटत होती. त्यातच सायंकाळी पावसाला सुरुवात झाल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. सणोत्सवाच्या काळात वीज पुरवठा खंडीत होत असल्याने संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या.

पावसाची दडी आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त
गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आज सकाळपासून वातावरणात प्रचंड उकाडा होता. त्यातच घरातील कामे सुरु होती अशा परिस्थितीत जीव घामाघूम होत असताना पंख्यांची हवा मोकळा श्वास घेऊ देत असतानाचा बुलडाणा शहरातील खंडीत झालेला विद्युत पुरवठा तब्बल तीन तासानंतर सुरळीत सुरु झाला होता. या दरम्यान नैसर्गिक हवाही नसल्याने अनेकांचा जीव कासावीस झाला होता. दररोज तसाही विद्युत पुरवठा कधीही खंडीत होत असल्याने महिलांच्या घरगुती कामांवर परिणाम होत आहे.

बातम्या आणखी आहेत...