आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ठाणे:‘लव्ह बर्ड’ला नागरिकांनी पोहोचवले पोलिस ठाण्यात च प्रेमात पडले अनेक तरूण

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेमात पडलेले अनेक तरूण तरुणी नव्वदच्या दशकातील हम दोनो दो प्रेमी दुनिया छोड चले... हे गाण म्हणत टोकाचे पाऊल उचलताना अनेक घटना घडल्या आहे. अगदी या गीताला साजेशी घटना बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गाव परिसरात ८ जून रोजी घडली. निर्जनस्थळी आढळलेल्या या लव्ह बर्डची सुज्ञ नागरिकांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने अखेर त्या प्रेमी युगुलांना पोलिसांच्या स्वाधीन केले. बुलडाणा तालुक्यातील एका गावातील युवक आणि मराठवाड्यातील एका भल्यामोठ्या शहरातील तरुणी बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावाच्या परिसरात ८ जून रोजी दुपारी आढळून आले. शेतात नागरिकांना या जोडप्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने त्यांनी त्यांची विचारपूस केली. या विचारपूस मध्ये दोघांनीही उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने त्या दोघांवर संशय बळावला. त्यामुळे ही माहिती आधी ग्रामीण पोलिस स्टेशनला दिल्यानंतर दुपारी त्या जोडप्याला पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. तरुणीच्या नातेवाइकांशी पोलिसांनी संपर्क करत याबाबतची माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...