आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:शेतातून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी

मोताळा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतातून बैलगाडी नेल्याच्या कारणावरून दोन गटात काठीने हाणामारी झाल्याची घटना पिंपळखुटा येथे ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून दोन्ही गटातील सहा जणांविरुद्ध बोराखेडी पोलिसांत आज मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळखुटा येथील नंदकिशोर म्हैसागर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास विनोद मालठाणे याने त्याची बैलगाडी नंदकिशोर म्हैसागर यांच्या शेतातून नेली असता त्याला शेतातून बैलगाडी का नेली, अशी विचारणा केली.

बातम्या आणखी आहेत...