आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात जणांविरुद्ध गुन्हा:रोहिणखेड येथे दोन गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी

मोताळा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना रोहिणखेड येथे १ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून रोहिणखेड येथील दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध धामणगाव बढे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहिणखेड येथील आसमा बी यांच्या मावशीच्या घरासमोर टिनपत्रे ठेवलेली होती. १ ऑगस्ट रोजी दुपारी आसमा बी यांच्या शेजारी राहत असलेले मोहम्मद सगीर गुलाब नबी यांचा मुलगा टिनावर खेळत होता. त्यावेळी आसमा बी यांनी टिनावर खेळू नको टिन लागेल असे सांगितले. त्यावरून मोहम्मद सगीर गुलाब नबी आणि शाईन सगीर यांनी अश्लील शिविगाळ केली. तेव्हा आसमा बी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता मोहम्मद सगीर, शाईन या दोघांनी लाकडी काठीने मारहाण केली.

दरम्यान शाहनवाज बी भांडण सोडवण्यासाठी गेली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली, अशी आसमा बी यांनी धामणगाव बढे पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून मोहम्मद सगीर, शाईन सगीर या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या गटातील रोहिणखेड येथील मोहम्मद सगीर गुलाम नबी यांनी पोलिसांत तक्रार दिली की, संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांचा चार वर्षीय मुलगा घरासमोर टिनपत्रावर खेळत होता. त्यामुळे रहिमा बी अब्दुल रहिम यांनी शिविगाळ केली. त्यावेळी मोहम्मद सगीर यांनी रहिमा बी यांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता रहिमा बी, अब्दुल नशीब, आसमा बी, शन्ना बी, इत्तेखार ही गैर कायद्याची मंडळी जमवून त्यांनी मो.सगीर यांना चापटबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी मो. सगीर यांच्या पत्नीने भांडण सोडवण्याचे प्रयत्न केले असता त्यांना पाठीत काठी मारून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी रहिमा बी, अब्दुल नशीब, आसमा बी, शन्ना बी, इत्तेखार या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...