आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन विभाग:रोहिनखेड शिवारात सफाई करणारे ट्रॅक्टर ताब्यात ; वन विभागाकडून ट्रॅक्टरसह सहा लाखाचा माल जप्त

मोताळाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रोहिनखेड वनपरिक्षेत्रात अपप्रवेश करून वन विभागाच्या जमिनीची साफसफाई करताना ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास वन विभागाकडून करण्यात आली आहे. रोहिनखेड राखीव वनक्षेत्रात अपप्रवेश करून वन विभागाच्या जमिनीवर ट्रॅक्टरने साफसफाई होत असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. या माहितीवरून वन कर्मचाऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार केले. त्यामध्ये वनपाल सुधीर जगताप, वनरक्षक आर. बी. सिरसाट, पी.पी. मुंढे, एस.पी. कुशोड, ए.एस. मोरे, ए.डी. बगळे यांचा समावेश होता. या पथकाने रोहिनखेड राखीव वनपरिक्षेत्रात जावुन पाहणी केली असता वन विभागाच्या जमिनीवर दोन व्यक्ती ट्रॅक्टरने साफसफाई करताना दिसून आले. त्यानंतर पथकाने साडे पाच लाख रुपये किमतीचा एक विना नंबरचा ट्रॅक्टर व ७५ हजार रुपये किमतीचा नांगर असा एकूण सहा लाख पंचवीस हजारांचा माल जप्त केला आहे. वृत्त लिहि पर्यंत दोघांची चौकशी सुरू होती. यापुढे कोणीही वन विभागाच्या हद्दीत अपप्रवेश करून वन विभागाच्या जमिनीवर साफसफाई करू नये, अन्यथा त्यांच्यावर वन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...