आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:वनोजा येथे अवैध दारूचे अड्डे बंद करा; अन्यथा चौकात विक्रीला परवानगी द्या

वनोजा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा येथे गावठी, देशी, विदेशी दारूची विक्री सकाळपासूनच सुरुवात होते. यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास होत आहे. गावला लागून शेतात दारु पिऊन येऊन पिकाचे नुकसान करत आहेत. तरी याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी. अन्यथा चौकात दारू विक्रीची परवानगी द्यावी, अशा आशयाचे निवेदन कुलदीप इंगोले यांनी ग्रामप्रशासन व मंगरुळपीर पोलिस ठाण्यात दिले.

वनोजा येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री होत आहे. यामुळे तरूण पिढी व्यसनाधीन होत आहे. ग्रामप्रशासनाने, पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालून गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैधरित्या होत असलेली दारु विक्री बंद करावी. अशी मागणी वनोजा येथील कुलदीप इंगोले यांनी केली आहे. वनोजा येथे गाव परिसरात अनेक लोक गावठी दारू भट्टी लावून तसेच काही लोक बाहेर गावावरून देशी, विदेशी दारू आणुन गावात विक्री करत आहेत. तर काही घरात साठा करून ठेवत आहेत. त्यामुळे लहान मुले दारूच्या आहारी गेले असून, अनेक कुटुंब उध्वस्त होत आहेत. त्यामुळे कुलदीप इंगोले यांनी अवैध दारू विकणाऱ्या विरोधात मंगरूळपीर पोलिस स्टेशन व ग्राम प्रशासनाला निवेदन देवून अवैध दारू विक्री करण्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...