आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेनटाकळी प्रकल्पावरील वीजपुरवठा हा एक्सप्रेस फिडरद्वारे असून, तो वारंवार स्ट्रीपिंग व खंडित होत आहे. परिणामी पाणीपुरवठा विलंबाने होत आहे. त्यामुळे फिडरवरील अतिरिक्त जोडणी त्वरीत बंद करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना नुकतेच निवेदन दिले.
पेनटाकळी प्रकल्पावरील विद्युत एक्सप्रेस फिडरवर पाटबंधारे विभाग मेहकर, एमआयडीसी चिखली, ग्रामपंचायत गजरखेड, लोणी लव्हाळा यांची अतिरिक्त वीजजोडणी आहे. त्यामुळे पेनटाकळी प्रकल्पावरील वीज पुरवठ्यावर जास्त प्रमाणात लोड येत असल्याने वीजपुरवठा वारंवार स्ट्रीपिंग होत आहे.
त्यामुळे प्रकल्पावरील एक्सप्रेस फिडरला जोडलेली इतरांची जोडणी तत्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी गणेश बरबडे यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, बुलडाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, चिखली उपतालुकाध्यक्ष संदीप नरवाडे, बुलडाणा उप तालुकाध्यक्ष रवी तायडे, विभाग अध्यक्ष मंगेश उगले, निशांत गायकवाड, मोहन मेहेत्रे, सतीश वैद्य, गणेश इंगळे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.