आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाखो‎ भाविकांचे श्रद्धास्थान:सैलानीत पेटली नारळाची होळी‎

बुलडाणा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यासह परराज्यातील लाखो‎ भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी‎ यात्रेत आज ६ मार्च रोजी हजारो नारळाची‎ होळी पेटवण्यात आली. यावेळी असंख्य‎ भाविकांनी होळीचे दर्शन घेतले.‎ तीन वर्षानंतर हजारो नारळाची होळी शेख‎ रफिक मुजावर, शेख शफिक मुजावर, शेख‎ जहीर मुजावर, शेख चांद मुजावर व शेख नई‎ मुजावर यांच्या हस्ते आज दुपारी होळीची‎ पूजा करून नारळाची होळी पेटवण्यात‎ आली. यंदा ढगाळ वातावरण असल्यामुळे‎ भाविकांची संख्या पन्नास टक्क्याने कमी‎ झाल्याचे दिसून आले.

जवळपास सैलानी‎ यात्रेत होळीसाठी एका लाखाच्या जवळपास‎ भाविक आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात‎ येत आहे. पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड,‎ अप्पर पोलिस अधीक्षक बिबी महामुनी,‎ उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन‎ कदम, तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली रायपूरचे ठाणेदार राजवंत‎ आठवले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.‎ यावेळी पंचायत समिती गटविकास‎ अधिकारी सविता पवार, विस्तार अधिकारी‎ डी.एम. जाधव, एम.आर. गवते, नितीन‎ पाटील, सुजित हिवाळे, महसूलचे कर्मचारी,‎ पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...