आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दंड वसूल‎:पंधरा पानटपरीधारकाकडून दंड वसूल‎

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिखली शहरातील पंधरा‎ पानटपरीवर जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने‎ कारवाई करून पानटपरी धारकांकडून तीन हजार‎ रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.‎ जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या‎ निर्देशानुसार प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.‎ सुशील चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी‎ डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली‎ शहरातील मुख्य परिसरातील शिवाजी ज्युनिअर‎ कॉलेज, बस स्थानक परिसर, खामगाव चौफुली,‎ आंबेडकर चौक आदी परिसरात पंधरा पानटपरीवर‎ कारवाई करीत तीन हजार रूपयांचा दंड वसूल‎ करण्यात आला.

ही कारवाई जिल्हा‎ अंमलबजावणी पथकांर्तगत अन्न व औषध सुरक्षा‎ अधिकारी सोळंके, पोलिस उपनिरीक्षक व्यवहारे,‎ पोलिस कर्मचारी मिसाळ, राष्ट्रीय तंबाखू‎ नियंत्रणाचे जिल्हा सल्लागार डॉ. भोसले,‎ समुपदेशक सरकटे यांच्या पथकाने केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...